
'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर. 
सध्या इशा चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे तिने 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडली आहे. 
अक्कलदाढ काढण्यासाठी केलेलं ऑपरेशन आणि त्यानंतर शूटिंगसाठी तारखा देता येत नसल्याचं कारण देत इशाने ही मालिका सोडली. 
रसिका सुनीलने ही मालिका सोडल्यानंतर इशाला शनायाची भूमिका मिळाली होती. 
नकारात्मक भूमिका असली तरी रसिकाने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली होती. त्यामुळे इशा शनायाच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल का असा प्रश्न निर्माण झाला होता. 
मात्र इशानेही शनायाची भूमिका चांगल्याप्रकारे साकारली. 
आता पुन्हा एकदा इशाची जागा रसिका सुनील घेणार आहे. 
इशा नेहमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते आणि तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे सांगत असते. 
इशा अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत असून सोशल मीडियावर ती फोटो शेअर करत असते. -
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ इशा केसकर
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..