'सावित्रीजोती' मालिकेतील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने १३ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. संगीतकार व दिग्दर्शक आनंद ओकशी तिने लग्न केलं. शुभांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'जन्माच्या गाठी विधात्याने बांधलेल्या असतात असं म्हणतात. ही अनोखी गाठ विधात्यानेच बांधण्याचे ठरवले असावे म्हणून काल ही जन्मजन्मीची गाठ बांधली गेली. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम पाठिशी असूदेत,' असं लिहित तिने लग्नाचे फोटो पोस्ट केले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. शुभांगी आणि आनंदचा प्रेमविवाह आहे. शुभांगीच्या एका नाटकासाठी आनंदने संगीतकार म्हणून काम केलं होतं. याच नाटकासाठी त्याला पुरस्कारसुद्धा मिळाला होता. तेव्हापासून या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. शुभांगी ही 'सावित्रीजोती' मालिकेत चिमणामाईंची भूमिका साकारत आहे. सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/ शुभांगी

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..