-
बदलत्या काळाबरोबर महिलांनी पुरूषी मक्तेदारी असलेल्या प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली असून, सिनेसृष्टी याबाबतीत फार पुढे आहे. एकेकाळी सिनेसृष्टीत अभिनेत्रींच्या तुलनेत अभिनेत्यांचं मानधन जास्त होतं. पण, त्यातही आता बदल झालेला दिसून येतं. काही अभिनेत्रींनी अभिनयाच्या बळावर आपली छाप सोडली असून, चित्रपटासाठी अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेतले आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी..
-
दीपिका पदूकोण ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. 'पद्मावत' या चित्रपटासाठी तिने १२ कोटी रुपये माधन घेतल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच रणवीर सिंह ७ ते ८ कोटी मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते.
-
'राझी' चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी आलियाने १० कोटी रुपये मानधन घतले होते तर विकी कौशलने ३ ते ४ कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जाते.
-
'स्त्री' या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने ७ कोटी रुपये मानधन म्हणून घेतले होते तर राजकुमार रावने ६ कोटी घेतल्याचे म्हटले जाते.
-
'छिछोरे' चित्रपटासाठी देखील श्रद्धा कपूरने सुशांत सिंह राजपूत पेक्षा जास्त मानधन घेतले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
अभिनेत्री कंगना रणौत एका चित्रपटासाठी २७ कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे 'जजमेंटल है क्या' या चित्रपटासाठी तिने राजकुमार राव पेक्षा जास्त मानधन घेते असणार असे म्हटले जाते. राजकुमार राव एका चित्रपटासाठी ७ ते ९ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
-
अभिनेत्री करीना कपूर खान एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे 'वीरे दी वेडींग' या चित्रपटासाठी तिला इतर कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळाले असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटासाठी अभिनेता सुमित व्यासला जवळपास ८० लाख रुपये मानधन देण्यात आल्याच्या चर्चा सुरु होत्या.
-
'कि & का' या चित्रपटासाठी देखील करीनाने अभिनेता अर्जुन कपूर पेक्षा जास्त मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते. अर्जुनने या चित्रपटासाठी जवळपास ५ ते ७ कोटी रुपये मानधन म्हणून घेतले होते.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत