
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 
'दिल बेचारा' असं या चित्रपटाचं नाव आहे. 
या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघीने मुख्य भूमिका साकारली आहे. 
ट्रेलरमधील सुशांतच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 
या चित्रपटाचं नाव आधी 'किझी और मॅनी' ठेवण्यात आलं होतं. 
चित्रपटातील सुशांत आणि संजनामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली. 
जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. 
मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. 
येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुशांतचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू आणणारी सुशांतची ही भूमिका -
सर्व छायाचित्र सौजन्य- ट्विटर
“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”