-
अभिनेत्री आणि संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा तीन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. तिच्या आणि संजय दत्तच्या संसाराला आता १२ वर्ष पूर्ण झाली असून सुखाने त्यांचा संसार सुरु आहे. . (फोटो सौजन्य – मान्यता दत्त इन्स्टाग्राम)
-
मान्यता संजय दत्तला एका बॉलिवूड पार्टीमध्ये भेटली असे म्हटले जाते. त्यावेळी संजय दत्त दुसऱ्या कुणामध्ये तरी गुंतला होता, अशी चर्चा होती संजयला मान्यतामधला साधेपणा भावला असे म्हटले जाते.
-
दोन वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर मान्यता आणि संजय दत्तने लग्न केले. संजय दत्तचा जवळचा मित्र प्रदीप सिन्हा यांच्या वर्सोवा येथील ब्रदीनाथ टॉवरमधील घरात २००८ साली दोघांचे लग्न झाले. दोघांनी अत्यंत गुपचूपपणे हा विवाह केल्यानंतर इंडस्ट्रीलाही आश्चर्याचा धक्का बसला.
-
"संजय दत्तमुळे माझ्या आयुष्यात स्थिरता आली. मला खूप चांगला जोडीदार मिळाला. लग्नाआधी मी खूप वाईट परिस्थितीतून जात होते. मी फोन करुन मदत मागितली, संजू माझ्यामागे ठामपणे उभा राहिला. मी त्याला नऊ वर्षांपासून ओळखते. आम्ही दोघही खूप सकारात्मक आहोत".
-
"आम्हाला जगायला आणि दुसऱ्यांना जगू द्यायला आवडते. माफ करण्यावर आमच्या दोघांचा विश्वास आहे. २००५ मध्ये आम्ही दोघांनी परस्परांचा गांभीर्याने विचार सुरु केला. संजूला माझ्या भूतकाळाबद्दल सर्वकाही माहित होते. त्यामुळे त्याचे मित्र जेव्हा त्याला माझ्याबद्दल सांगायचे, तेव्हा तो हसण्यावारी विषय न्यायचा" असे मान्यता २००९ साली मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
-
संजय दत्तच्या लग्नाला त्याचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. जेव्हा प्रिया दत्त यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आपल्याला लग्नाबद्दल काही माहित नाही असे उत्तर दिले होते. पण आता प्रिया आणि मान्यता दत्त दोघींमध्ये चांगले नाते आहे.
-
संजू माझ्या मागे भक्कमपणे उभा राहिला, त्यामुळे इतर गोष्टींचा मला फरक पडला नाही. आज आई जिवंत असती, तर तिने मला स्वीकारलं असतं, असे संजू म्हणाला. यापेक्षा मला अजून काय हवं? असे मान्यता दत्त म्हणाली.
-
लग्नानंतर दोन वर्षांनी २१ ऑक्टोंबर २०१० रोजी संजय आणि मान्यता दत्त आई-बाबा झाले. मान्यताने गोंडस मुलगी आणि मुलगा असा जुळया मुलांना जन्म दिला. मान्यता दत्तमुळे संजय दत्तच्य आयुष्यात संतुलन आले, स्थिरता निर्माण झाली. "नवऱ्याचं घर संभाळण्याइतकं दुसरं कुठलं काम कठीण आहे, असं मला वाटत नाही. दुसऱ्या कुठल्याही नोकरीची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपते पण नवरा घरात आल्यानंतर तुमचा दिवस सुरु होतो. घर संभाळणं हे २४ तासाचं चॅलेंज आहे आणि मला आव्हानं आवडतात" असे मान्यता दत्त म्हणते.
-
मान्यता संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. संजयचा दिवंगत अभिनेत्री रिचा शर्मा बरोबर पहिला विवाह झाला होता. त्यानंतर रिआ पिल्लाई बरोबर त्याने संसार थाटला पण फार काळ हा विवाह टिकला नाही.
-
संसार, कुटुंबाच्या भल्याच्या ददृष्टीने तिचे आपल्या नवऱ्याच्या आर्थिक व्यवहारांवरही लक्ष असते. "मी कोणाचे नाव घेणार नाही. पण संजू उगाचच विनाकारण काही लोकांसाठी खर्च करत होता. ते आता पूर्णपणे बंद झालं आहे. जी त्याची जबाबदारी नाहीय, ते खर्च संजय दत्त करत होता. त्यामुळे काही लोकांना मी आवडत नाही. काही चुकीची माणेस त्याचे आर्थिक व्यवहार संभाळत होती. त्याच्या अकाऊंटसमध्ये भरपूर गडबड होती. जर मी माझे तोंड उघडले, तर कोणीही त्यातून सुटणार नाही" असे मान्यता दत्त मिडे डे ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…