-
डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रोतोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या काय करतायेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया त्या सध्या काय करतायेत..
-
कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली.
-
तो व्हिडीओ पाहून अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली आणि रानू यांचे पूर्ण आयुष्य बदलले. मात्र या गाण्यानंतर रानू काय करत आहेत असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.
-
सध्या रानू मंडल या त्यांच्या कुटुंबीयांसोबत जुन्या घरात राहात असल्याचे म्हटले जात आहे.
-
तसेच एकीकडे सध्या लॉकडाउनमुळे त्यांना काम मिळत नसल्यामुळे त्या त्यांच्या जुन्या घरात राहत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
तर दुसरीकडे रानू मंडल त्यांच्या बायोपिकचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांच्या जुन्या घरात राहत असल्याचे म्हटले जात आहे.
-
चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलने रानू मंडल यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता.
-
या चित्रपटातील रानू यांच्या भूमिकेसाठी दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्तीची निवड करण्यात आली होती
-
खुद्द सुदीप्ताने ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.
-
या चित्रपटाचे नाव ‘प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल’ असे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट