बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा हिने पती रायन थामला घटस्फोट दिला आहे. "रायन आणि मी विभक्त झालो आहोत. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे", असं मिनिषाने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. अखेर मिनिषाने याबाबत मौन सोडलं आहे. २०१५ मध्ये मिनिषा व रायनने लग्नगाठ बांधली होती. या लग्नाचा दोघांचे कुटुंबीय व जवळचे मोजके मित्र उपस्थित होते. लग्नापूर्वी एक-दोन वर्षांपासून मिनिषा रायनला डेट करत होती. एका नाइट क्लबमध्ये दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. रायन हा व्यावसायिक असून अभिनेत्री पूजा बेदीचा तो चुलत भाऊ आहे. मिनिषा व रायनच्या लग्नाची बातमी सर्वांत आधी पूजा बेदीनेच माध्यमांना सांगितली होती. मिनिषाने २००५ मध्ये शूजित सरकारच्या 'यहाँ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'हनिमून ट्रॅव्हल्स लि.', 'बचना ऐ हसीनों', 'वेल डन अब्बा' आणि 'भेजा फ्राय २' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २०१४ मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ मिनिषा लांबा)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ