-
चित्रपट सृष्टीतील सुवर्णयुगाच्या स्मृती जागविणारा अजरामर चित्रपट म्हणजे 'मुगल ए आझम'. (Source: Photo by Express archives)
-
५ ऑगस्ट १९६० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तब्बल ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. (Source: Photo by Express archives)
-
'मुगल ए आझम' या चित्रपटाचं नाव कलाविश्वात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. तब्बल १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर के. आसिफ यांनी हा चित्रपट तयार केला. (Source: Photo by Express archives)
-
विशेष म्हणजे हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला किंबहूना आजही प्रेक्षकांच्या मनावर हा चित्रपट राज्य करत असल्याचं पाहायला मिळतं. (Source: Photo by Express archives)
-
या चित्रपटात पृथ्वीराज कपूर,दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Source: Photo by Express archives)
-
बॉलिवूडचा लोकप्रिय ठरलेला हा चित्रपट केवळ हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला नसून अन्य भाषांमध्येही त्याचं डबिंग करण्यात आल्याचं म्हटलं जातं. (Source: Photo by Express archives)
-
त्यामुळे हा चित्रपट चक्क तीन भाषांमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट त्या काळातील बिग बजेट चित्रपट असल्याचंही म्हटलं जातं. (Source: Photo by Express archives)
-
लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या या चित्रपटाचं त्याकाळी १.५ कोटी बजेट असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्याकाळी हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं. (Source: Photo by Express archives)
-
'मुगल ए आझम'ने त्याकाळात कोट्यवधींची कमाई केली होती असं म्हटलं जातं. (Source: Photo by Express archives)
-
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. (Source: Photo by Express archives)
-
विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. (Source: Photo by Express archives)
-
त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं. (Source: Photo by Express archives)

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?