-
कपिल शर्मा ही अशी व्यक्ती आहे जिनं आपल्या कलेच्या जोरावर आपलं नाव मोठं केलं. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार आज कपिल शर्माची वार्षिक कमाई ३० कोटी रूपये आहे. (फोटो – कपिल शर्मा, ट्विटर)
-
लक्झरीच्या प्रश्नावर कपिल शर्मा हा मोठ्या मोठ्या स्टार्सना टक्कर देतो. हे फारच कमी लोकांना माहित असेल की कपिलकडे जी व्हॅनिटी व्हॅन आहे आहे त्याची किंमत शाहरूख खान आणि सलमान खानच्या व्हॅनिटीपेक्षाही अधिक आहे.
-
कपिलनं २०१८ मध्ये ही व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली होती. तसंच ही व्हॅन डीसीनं डिझाईन केली होती.
-
कपिलची ही व्हॅन बॉलिवूडमधील सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅन्सपैकी एक आहे. कपिलनं ती ५.५ कोटी रूपयांना खरेदी केली होती.
-
यातील आतला लूक हा हॉलिवूड चित्रपटात व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गाडीप्रमाणे आहे.
-
ही व्हॅनिटी व्हॅन कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. आतून पाहिल्यानंतर ही व्हॅन सर्वांच्याच्याच मनात घर करण्यासारखी दिसते.
-
शाहरूखच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ४ कोटी रूपये तर सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत १.५ कोटी रूपये आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल