‘#MeToo’ चळवळीनंतर हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी चित्रपट मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याची जाहीर कबुली देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी सुद्धा आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. अभिनेत्री सुरवीन चावलानेदेखील मोठा आणि तितकाच धक्कादायक खुलासा केला होता. सुरवीनने एक-दोन वेळा नाही तर पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. ‘मी एकदा नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाले आहे. एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने माझ्या शरीराचा एक एक इंच पाहण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी माझ्या वजनामुळे सुद्धा मला ना ना प्रकारचे प्रश्न विचारले होते’, असं सुरवीन म्हणाली होती. ‘बॉलिवूडमधील दोन दिग्दर्शकांनी तर चक्क मला अंगप्रदर्शन करण्यास सांगितलं होतं. हा प्रकार माझ्यासाठी प्रचंड मनस्ताप देणारा होता’, असंही तिने सांगितलं होतं. सुरवीनने ‘पार्च्ड’, ‘अगली’ आणि ‘हेट स्टोरी २’ सिनेमांत काम केले आहे. तिने अनेक लघुपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. -
२०१५ मध्येच सुरवीनने अक्षय ठक्कर या तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं.
-
सहसा अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्यानंतर कलाविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. पण, सुरवीनने यातही तिचं वेगळेपण सिद्ध केलं.
-
‘माझ्या लग्न करण्यामुळे इतरांनी थक्क होण्याचं कारणच नाही. ते दिवस गेले जेव्हा अभिनेत्री त्यांच्या करिअरमधील काही ध्येय पूर्ण करुन त्यानंतरच लग्नाचा विचार करत असायच्या. आता तर लग्नानंतरही अनेक अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये पुढे जातात,' असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ