-
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा आज वाढदिवस आहे. ११ ऑगस्ट १९८५ रोजी बहरीन मानामा येथे जॅकलीनचा जन्म झाला. तिचे वडील एलरॉय श्रीलंकन तर आई किम मलेशियन आहे. (सर्व फोटो सौजन्य – जॅकलीन फर्नांडीस इन्स्टाग्राम)
-
जॅकलीनची आई किम हवाई सुंदरी होती. चार भावंडांमध्ये जॅकलीन सर्वात लहान आहे. तिला एक मोठी बहिण आणि दोन मोठे भाऊ आहेत.
-
जॅकलीनचे वडिल श्रीलंकेत संगीतकार होते. पण नागरी गृहयुद्धामुळे १९८० च्या दशकात ते बहरीनला निघून गेले.
-
वयाच्या १४ व्या वर्षी जॅकलिनने बहरीनमध्ये एका टेलिव्हिजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
-
ऑस्ट्रेलियातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवल्यानंतर जॅकलीनने श्रीलंकेत एका वाहिनीसाठी पत्रकार म्हणूनही काम केले होते.
-
जॅकलीनला फ्रेंच, अरेबिक आणि स्पॅनिश भाषेचेही चांगले ज्ञान आहे. वाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करत असताना जॅकलीनला मॉडलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली.
-
२००६ साली जॅकलीनने श्रीलंकेत मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रतिनिधी करण्यासाठी असलेली सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने २००६ साली मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले.
-
२००८ साली जॅकलीन फर्नांडीसचे बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलिफा यांच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते असे बोलले जाते. तीन वर्ष हे प्रेम प्रकरण चालले. २०११ साली हाऊसफुल २ प्रदर्शित झाल्यानंतर दोघांच्याही वाटा वेगळया झाल्या. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
-
बहरीनच्या राजपुत्राबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर जॅकलिनचे नाव हाऊसफुल २ चा दिग्दर्शक साजिद खान बरोबर जोडले गेले.
-
सलमान खानची जवळची मैत्रीण असण्याबरोबरच जॅकलीनने बॉलिवूडमध्ये आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ