-
नुकताच 'फॉर्ब्स'ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी जाहिर केली आहे. ही यादी १ जून २०१९ ते १ जून २०२० या कालावधीमध्ये अभिनेत्यांनी केल्या कमाईवर आधारित आहे. या यादीत समाविष्ट होणाऱ्या अभिनेत्यांची सर्वाधिक कमाई ही जाहिरातींमधून झाली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा देखील समावेश आहे. चला पाहूया या यादीमधील टॉप १०अभिनेते…
-
या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘द रॉक’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ड्वेन जॉनसन आहे. ड्वेनने १ जून २०१९ पासून १ जून २०२० पर्यंत जवळपास ६५४ कोटी रुपयांची (८७.५ मिलियन डॉलर्सची) कमाई केली आहे. (Photo: AP Images)
तर हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने जवळपास ७१.५ मिलियन डॉलर्स ( जवळपास ५३४ कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे. -
या यादीत तिसऱ्या स्थानावर मार्क व्हालबर्ग असून त्याची कमाई ५८ मिलियन डॉलर्स (जवळपास ४३३ कोटी रुपये) इतकी आहे.
-
अभिनेता, दिग्दर्शक बेन एफ्लेक चौथ्या क्रमांवर आहे. त्याने ५५ मिलियन डॉलर्स (जवळपास ४११ कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे. (Photo: AP Images)
-
पाचव्या क्रमांकावर आहे विन डिसेल. त्याने ५४ मिलियन डॉलर्स (जवळपास ४०३ कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे.(Photo: AP Images)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची कमाई ४८.५ मिलियन डॉलर (जवळपास ३६२ कोटी रुपये) इतकी असून तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. -
मॅनुएल मिरांडाने ४५.५ मिलियन डॉलर्सची (जवळपास ३४० कोटी रुपये) कमाई करत सातवे स्थान पटकावले आहे.(Photo: AP Images)
-
विल स्मिथने ४४.५ मिलियन डॉलर्सची (जवळपास ३३२ कोटी रुपये) कमाई करत आठवे स्थान पटकावले आहे.
-
४१ मिलियन डॉलर्सची (जवळपास ३०६ कोटी) रुपये कमाई करत एडम सँडलर नव्या क्रमांकावर आहे.(Photo: AP Images)
-
जॅकी चैन १०व्या क्रमांकावर असून त्याने ४० मिलियन डॉलर्सची (जवळपास २९९ कोटी रुपये) कमाई केली आहे.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ