-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. संजय दत्तचं आतापर्यंतच आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य – मान्यता दत्त इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडच्या या चंदेरी दुनियेत संजय दत्तला यश भरपूर मिळालं. पण अनेक वादांमध्ये तो अडकला. मान्यता आयुष्यात आल्यानंतर आता कुठे त्याचं आयुष्य स्थिरस्थावर होत असताना त्याला कॅन्सरने गाठलं.
-
कॅन्सर एक दुर्धर आजार आहे. त्यामुळे आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी संजय दत्तला पुन्हा एकदा खडतर लढाई लढावी लागणार आहे. संजय दत्त आतापर्यंत अनेक संकटांवर मात करुन बाहेर आला आहे. त्यामुळे ही लढाई सुद्धा तो नक्की जिंकेल. संजय बरोबर परीक्षा असणार आहे ती, त्याची पत्नी मान्यताची.
-
संजय दत्त बरोबर प्रेमसंबंध ते लग्न हा प्रवास तिच्यासाठी सुद्धा सोपा नव्हता. संजय दत्तला साथ देत असताना तिला सुद्धा अनेक टप्प्यांवर संघर्ष करावा लागला आहे.
-
संजय-मान्यताला दोन मुले असून त्यांचा संसार सुखाने सुरु असताना आता हे संकट आले आहे. त्यामुळे नवरा, मुलं, संसार संभाळताना निश्चित मान्यता दत्तचा सुद्धा कस लागणार आहे.
-
मान्यता संजय दत्तला एका बॉलिवूड पार्टीमध्ये भेटली असे म्हटले जाते. त्यावेळी संजय दत्त दुसऱ्या कुणामध्ये तरी गुंतला होता, अशी चर्चा होती संजयला मान्यतामधला साधेपणा भावला असे म्हटले जाते.
-
दोन वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर मान्यता आणि संजय दत्तने लग्न केले. संजय दत्तचा जवळचा मित्र प्रदीप सिन्हा यांच्या वर्सोवा येथील ब्रदीनाथ टॉवरमधील घरात २००८ साली दोघांचे लग्न झाले. दोघांनी अत्यंत गुपचूपपणे हा विवाह केल्यानंतर इंडस्ट्रीलाही आश्चर्याचा धक्का बसला.
-
"आम्हाला जगायला आणि दुसऱ्यांना जगू द्यायला आवडते. माफ करण्यावर आमच्या दोघांचा विश्वास आहे. २००५ मध्ये आम्ही दोघांनी परस्परांचा गांभीर्याने विचार सुरु केला. संजूला माझ्या भूतकाळाबद्दल सर्वकाही माहित होते. त्यामुळे त्याचे मित्र जेव्हा त्याला माझ्याबद्दल सांगायचे, तेव्हा तो हसण्यावारी विषय न्यायचा" असे मान्यता २००९ साली मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
-
संजय दत्तच्या लग्नाला त्याचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. जेव्हा प्रिया दत्त यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आपल्याला लग्नाबद्दल काही माहित नाही असे उत्तर दिले होते. पण आता प्रिया आणि मान्यता दत्त दोघींमध्ये चांगले नाते आहे.
-
संजू माझ्या मागे भक्कमपणे उभा राहिला, त्यामुळे इतर गोष्टींचा मला फरक पडला नाही. आज आई जिवंत असती, तर तिने मला स्वीकारलं असतं, असे संजू म्हणाला. यापेक्षा मला अजून काय हवं? असे मान्यता दत्त म्हणाली होती.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ