Alia Bhatt House Photos : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला अल्पावधीच प्रसिद्दी, नाव आणि पैसा मिळाला. सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखलं जातं. आलिया भट्टा वडील महेश भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यापासून वेगळं राहतेय. आलियाचं हे लग्जीरियस घर स्टाइलिश आणि सुंदर आहे. पाहूयात आलिया भट्टचे अलिशान आणि लग्जीरियस घर कसे दिसतेय… आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री आलिया भट्टनं जुहू येथे स्वत:साठी घर विकत घेतलं आहे. या घरासाठी आलियानं दुप्पट किंमत मोजली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे घर २३ हजार स्क्वेअर फूट आहे. आलिया भट्टने हे घर १३ करोड रुपयात खरेदी केलं आहे. आलियाच्या या आलिशान घराला फेमस इंटीरियर डिजायनर रिचा बहलने सजवलं आहे. आलियानं आपलं घर आर्टिस्टिक पद्धतीनं सजवलं आहे. घरामध्ये लाइट कलराचा वापर केला आहे. घरातील फर्नीचरही क्लासिक पद्धतीचं आहे. रिचानं घर सजवताना आलिया भट्टची आवड आणि नावड पाहिली आहे. आलियाच्या आडीनुसार घर सजवलं आहे. आलियाचं घर मुंबईतील जुहूमधल्या उच्चभ्रू वस्तीत आहे. -
‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियानं ‘टु स्टेट’, ‘उडता पंजाब’, ‘डिअर झिंदगी’, ‘राझी’ सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. ‘राझी’च्या यशानंतर तिच्या मानधनातही वाढ झाली. बॉलिवूडमधल्या यशानंतर आलियानं रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ