अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून सोशल मीडियावर अनुष्का व तिचा पती विराट कोहलीने फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 'आरसीबी बोल्ड डायरीज' या आयपीएल टीमच्या युट्यूब चॅनलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विराटने त्याच्या भावना व्यक्त केल्या. "ही एक अविश्वसनीय भावना आहे. हा अनुभव एक वेगळाच दृष्टीकोन देतो. अत्यंत सुंदर भावना असून त्याला शब्दांत कसं मांडायचं हे मला समजत नाहीये", असं विराट म्हणाला. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल तो पुढे म्हणाला, "अनुष्का आणि मी तर सातव्या आकाशावर होतो. सोशल मीडियावर जेव्हा आनंदाची बातमी सांगितली तेव्हा लोकांकडून शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. काही लोक भावूकसुद्धा झाले." लॉकडाउनमुळे अनुष्कासोबत अधिकाधिक वेळ घालवायला मिळाला असंही त्याने सांगितलं. "प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही डेट करत असल्यापासून आम्हाला एकमेकांसोबत घालवायला पुरेसा वेळ कधीच मिळाला नव्हता. लॉकडाउनमुळे आम्हाला हा वेळ मिळाला आणि आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक वेळ होता", असं विराटने सांगितलं. "ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, त्या व्यक्तीसोबत पूर्ण वेळ घरी राहायला मिळणं, यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं", अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. गेल्या आठवड्यात विराट-अनुष्काने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांना दिली. 'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', असं म्हणत विरुष्काने फोटो पोस्ट केला होता. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराटने डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. इटलीत अत्यंत मोजक्या कुटुंबीयांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. विराट आणि अनुष्का ही सर्वाधिक चर्चेत असलेली सेलिब्रिटी जोडी आहे. अनुष्काने सोशल मीडियावर प्रेग्नंसीची बातमी जाहीर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. विराट-अनुष्कावरून भन्नाट मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, विराट कोहली)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल