-
सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान गेल्या काही काळापासून गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रीयानीसोबत राहात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दोघांचे फोटो आणि व्हिडीओज अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अगदी लॉकडाउनच्या काळातही दोघे एकत्र राहात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॉर्जिया एक इटॅलियन अभिनेत्री, मॉडेल आहे. येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॉर्जिया 'वेलकम टू बजरंगपुर' या चित्रपटामधून बॉलवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. तसेच अरबाज खान स्वत: या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
श्रेयस तळपदे, संजय मिश्रा, तिग्मांशु धूलिया यांसारखे अनेक नामांकित कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
खरं तर 'वेलकम टू बजरंगपुर'ची निर्मिती २०२० मध्येच केली जाणार होती. पण करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान लवकरच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र नांदत होती. गेल्यावर्षी अरबाजनं पत्नी मलायकाशी घटस्फोट घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर अरबाज आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी एकमेकांना डेट करू लागले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आता हे दोघं २०२१ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याला खान कुटुंबानं मान्यता दिली असल्याचं समजत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॉर्जिया अँड्रीयानी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॉर्जिया अँड्रीयानी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल