-
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोन्ही सुपरस्टार्स पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत.
-
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एटली कुमार करणार आहे.
-
एटली कुमार हे नाव याआधीही ऐकलं नसेल मात्र त्याचा फोटो मात्र तुम्ही नक्कीच पाहिला असेल. कारण एटली आणि त्याच्या पत्नीचे फोटो अनेकदा सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य : Twitter वरुन)
-
मागील अनेक वर्षांपासून एटली आणि शाहरुख एकत्र काम करण्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र अखेर या चित्रपटासंदर्भातील महत्वाची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
एटली दिग्दर्शित करत असलेल्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाने नाव ’सनकी’ असं असणार आहे.
-
दीपिकाला ’सनकी’ या चित्रपटाची कथा आवडल्याने तिने तात्काळ चित्रपटाला होकार दिला असं फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
-
थेट दीपिका आणि शाहरुखच्या चित्रपटाचे दिग्दर्शक करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा एटली कुमार नक्की आहे तरी कोण याचबद्दल आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
एटली कुमार हा हिंदीत पदार्पण करणार असला तरी तो तामीळ फिल्म इंडस्ट्रीमधील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
तामीळनाडूमधील मदुरईमध्ये २१ सप्टेंबर १९८६ रोजी जन्मलेल्या एटलीचं पूर्ण नाव अरुण कुमार आहे. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
एटली तामीळ चित्रपट सृष्टीमध्ये त्याच्या दिग्दर्शनाबरोबरच स्क्रीनप्ले रायटींग आणि निर्माता म्हणून ओळखला जातो.
-
२०१३ साली 'राजा राणी' चित्रपटामधून एटलीनं खऱ्या अर्थाने तामीळ चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
फॉक्स स्टार स्टुडीओ आणि ए. आर. मुर्गुदास यांची संयुक्त निर्मिती असणाऱ्या ‘राजा राणी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने दक्षिण भारतात चार आठवड्यांमध्येच ५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
रोमॅन्टीक कॉमेडी असणारा एटलीचा 'राजा राणी’ हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. या चित्रपटामध्ये आर्या, जय, नयनतारा, नाझरीया नाझिम, सत्यराजा असे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार होते. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
‘राजा राणी’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर एटलीला ‘सर्वोत्तम दिग्दर्शक (पदार्पण)’ या पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजय अवॉर्ड्स या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील पुरस्कार सोहळ्यात एटलीला हा सन्मान देण्यात आला. (फोटो सौजन्य : विकिपीडियाववरुन साभार)
-
‘राजा राणी’ चित्रपटाच्या आधी एटलीने एस शंकर यांच्या एन्थीरान (२०१०) आणि नानबान (२०१२) चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
‘राजा राणी’च्या यशानंतर एटलीने थारी (२०१६), मिरसाल (२०१७) आणि बिगील (२०१९) या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मिती आणि स्क्रीन प्ले रायटींग केलं. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
एटलीच्या सर्व गाजलेल्या (‘राजा राणी’ चित्रपट वगळता इतर) चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व चित्रपटांचा प्रमुख अभिनेता हा विजय होता. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
दिग्दर्शनानंतर एटलीने ‘ए ऑफ अॅपल प्रोडक्शन’ नावाची कंपनी स्थापन करुन निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. २०१७ साली त्याने फॉक्स स्टार इंडियाच्या सोबत आपल्या कंपनीच्या बॅनरखाली पहिला चित्रपट निर्माण केला. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
एटलीने २०१४ साली अभिनेत्री कृष्णा प्रियासोबत लग्न केलं. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
एटली आणि कृष्ण प्रिया आठ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते असं सांगितलं जातं. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
२००६ साली प्रिया एका मालिकेत काम करत होती. याच मालिकेत एटलीचा मित्र देखील काम करायचा. त्यानेच प्रिया आणि एटलीची भेट घालून दिली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
प्रियाचं सुंदर दिसणं आणि एटलीचा रंग या दोन कारणांमुळे या दोघांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर अनेकदा व्हायर होत असतात. खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने फोटो व्हायरल करणाऱ्यांना एटलीच्या यशाबद्दल समजल्यानंतर मात्र त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्या वाचून राहत नाही. एटलीचे हजारो चाहते असून त्वचेचा रंग हा आपल्या कर्तृत्वाची ओळख असू शकत नाही हेच एटली आपल्या कामातून दाखवून देतो असं त्याचे चाहते सांगतात. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
२०१९ मध्ये एका आयपीएल सामन्यादरम्यान एटली कुमार हा कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानच्या बाजूला बसला होता. या दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एटलीला ट्रोलही करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य : Twitter वरुन)
-
अनेकदा एटलीला रंगावरुन ट्रोल केलं जात असलं तरी त्याच्या कामाने त्याने आपलं नाणं तिकीटबारीवर खणखणीत चालतं हे सिद्ध करुन दाखवलं आहे. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
‘सनकी’ हा चित्रपट तामिळ आणि हिंदी भाषेत बनवण्यात येणार आहे. एटलीची शैली या चित्रपटाच्या कथेमध्ये आणि दिग्दर्शनामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न असून संपूर्ण भारतामध्ये खास करुन हिंदी पट्ट्यामध्ये या चित्रपटाकडून चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.
-
‘सनकी’ चित्रपट २०२१ च्या शेवटी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र करोनामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण आणि शेड्युलला फटका बसल्यास प्रदर्शिनाची तारीख लांबू शकते असा अंदाज आहे.
-
एटली दिग्दर्शित करत असणाऱ्या हा हिंदीतील पहिला चित्रपट असला तरी शाहरुख आणि दीपिका एकत्र काम करणारा हा चौथा चित्रपट असणार आहे. (फोटो सौजन्य : Twitter/Atlee_dir वरुन साभार)
-
पूर्वी शाहरुख आणि दीपिकाने ‘ओम शांति ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
-
कृष्णा प्रिया आणि एटलीबद्दल भारतामधील चित्रपट चाहत्यांना जास्त माहिती नसली तरी दक्षिण भारतामध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत.
-
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांबरोबरच या आगामी चित्रपटाची एटलीच्या चाहत्यांनाही बरीच उत्सुकता असल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहे. आता हा चित्रपट एटलीच्या इतर चित्रपटांप्रमाणे दणदणीत कामगिरी करतो का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”