-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आहे. ती सुशांतच्या आठवणीमध्ये फोटो शेअर करताना दिसते. तसेच अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांसोबत मिळून सुशांतची स्वप्ने पूर्ण करताना दिसते आहे. तिने नुकताच सुशांतच्या बहिणीने सुरु केलेल्या plants4ssr हा हॅशटॅग वापरत फोटो शेअर केले आहे.
-
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती तिच्या कुत्र्यासोबत बाल्कनीमध्ये असल्याचे दिसत आहे.
-
तसेच ती झाडे लावताना दिसत आहे.
-
हे फोटो पोस्ट करत अंकिताने छान असे कॅप्शन दिले आहे.
-
'हॅची आणि मम्मी. प्रत्येक कामात माझ्यासोबत असणारा. मी झाडे लावते. सुशांतचे स्वप्न पूर्ण करुन त्याला आठवण्याचा आमचा हा मार्ग आहे' या आशयाचे तिने कॅप्शन दिले आहे.
-
तसेच या कॅप्शनसोबत तिने हॅशटॅगचा वापर करत plants4ssr असे म्हटले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने या विषयी सुशांतच्या चाहत्यांना सांगितले होते.
-
तिने शनिवारी ट्विट करत 'उद्याच्या हॅशटॅग plants4ssr विषयी विसरु नका' असे म्हटले होते.
-
आता सुशांतचे हे स्वप्न एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्ण करताना दिसत आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल