-
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या या पात्रांसोबतच मालिकेतील आणखी एक पात्र प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतं… ते म्हणजे प्रज्ञा.
-
या मालिकेत नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमधील प्रज्ञाचा लूक सोशल मीडियावर मीम्सचा विषय ठरला आहे.
-
प्रज्ञाने लावलेल्या काळ्या लिपस्टिकवरून सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
-
मालिकेत प्रज्ञा कारखानीस ही नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी साठे चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
-
संजीवनीची ही पहिलीच मराठी मालिका आहे आणि पदार्पणातच तिने चाहत्यांवर छाप सोडली आहे.
-
नकारात्मक भूमिका असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते आणि हेच तिच्या अभिनयाचं यश आहे.
-
सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल