सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर हा 'जागतिक अभियंता दिन' म्हणून साजरा होतो. नवनवीन संकल्पनांचा आधार घेत इंजिनीअरिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणे हीसुद्धा राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठी प्रयोगशील भूमिका असते. बॉलिवूडमधील बऱ्याच प्रसिद्ध कलाकारांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. बॉलिवूडमधील या 'इंजिनीअर्स'बद्दल जाणून घेऊयात.. -
क्रिती सनॉन 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री क्रिती सनॉनने जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर तिला मॉडेलिंग ऑफर्स मिळू लागले. मॉडेलिंगनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनू सूद यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभिनेता सोनू सूदने इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली. मात्र इंजिनीअरिंगमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याने सोनूने अभिनयाकडे त्याचा मोर्चा वळवला. तापसी पन्नू दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा कम्प्युटर इंजिनीअर आहे. चित्रपटात काम करण्याआधी ती एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. -
'रहना है तेरे दिल मै' या चित्रपटानंतर तरुणींच्या मनात कायमचं स्थान मिळवलेला अभिनेता आर. माधवन याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
कार्तिक आर्यन सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा इंजिनीअर आहे. डीवाय पाटील कॉलेजमधून तो शिक्षण घेत होता. बॉलिवूडमध्ये काम करता करता त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. कादर खान विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते कादर खान यांनीसुद्धा इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ते प्राध्यापकसुद्धा होते. फवाद खान 'कपूर्स अँड सन्स', 'खूबसुरत' या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता फवाद खानने टेलिकॉम इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. अॅरोनॉटिकल इंजिनीअर किंवा पायलट होण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण नशिबात मात्र वेगळंच लिहिलेलं होतं.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल