-
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलीटी शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शहनाज गिल आपल्या नव्या लूकमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहजाज 'बिग बॉस'च्या १३ व्या सीझनमध्ये झळकली होती. वजनदार शरीरामुळे या शोमध्ये अनेकदा तिची खिल्ली उडवली जायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी तिची खिल्ली उडवणारे काही मिम्स देखील व्हायरल झाले होते. परंतु शहनाजने आपलं वजन कमी करुन टीकाकारांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाजने गेल्या सहा महिन्यात तब्बल १३ किलो वजन कमी केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून शेहनाजने वजन कमी करण्याचं सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आईसक्रीम, चॉकलेट आणि मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मोठ्या प्रमाणावर कर्बोदकं देणारे पदार्थ कमी करुन तिने प्रथिनं देणारे पदार्थ खाण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती दिवसाला १३ ग्लास पाणी पिते व दोन तास नियमित व्यायाम करते. अशा नियोजनपद्धतीने तिने १३ किलो वजन कमी केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
वजन कमी केल्यानंतर तिने आपल्या नव्या लूकचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाजचा हा बदललेला लूक पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आजवर अनेकांनी माझ्या वजनाची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये मी वजन कमी करण्याचा निश्चय केला होता. सुरुवातीला मला ठरवलेलं वेळापत्रक फॉलो करताना प्रचंड त्रास झाला परंतु नंतर त्याची सवय झाली" असा अनुभव या मुलाखतीमध्ये शेहनाजने सांगितला.
-
"फक्त भरपूर व्यायाम करुन किंवा कमी अन्न खाऊन वजन कमी करता येत नाही. तर सकस आहार आणि योग्य व्यायाम यांची योग्य सांगड घालावी लागते. तरच तुम्ही वजन कमी करु शकता." असा संदेश तिने आपल्या चाहत्यांना दिला.
-
शहनाज गिल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”