-
सोनी टीव्हीवर प्रसारित होणारी क्राईम पेट्रोल ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचं काम करत आहे. (सर्व फोटो – युट्यूब, इन्स्टाग्राम)
-
सत्य घटनांवर आधारित या मालिकेमध्ये काम करणारे कलाकारही आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत.
-
यापैकी काही कलाकार असेही आहे ज्यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर यश मिळवलंय. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे संजीव त्यागी.
-
संजीव त्यागी हे गेल्या १५ वर्षांपासून क्राईम पेट्रोल या मालिकेशी जोडले गेले आहेत.
-
त्यांनी या मालिकेत गुन्हेगारासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भूमिका साकारली आहे.
-
त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक भागांमध्ये पोलीसाची भूमिका साकारली आहे.
-
संजीव त्यागी यांनी दूरदर्शनवरील मनी देवो भव: या कार्यक्रमापासून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. त्यांनी अदालत या मालिकेतही अभिनय साकारला आहे. परंतु त्यांना ओळख ही क्राईम पेट्रोल या मालिकेतूनच मिळाली.
-
संजीव त्यागी यांनी अक्षय कुमारच्या बेबी या चित्रपटातही भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त त्यांनी अन्य काही चित्रपटांमध्येही लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
-
संजीव त्यागी हे सामाजिक कार्यातही पुढे आहेत. महिला आणि लहान मुलांशी निगडीत एका संस्थेशीही ते जोडले गेले आहेत.
-
संजीव त्यागी यांचा विवाह झाला असून ते आपलं वैयक्तिक आयुष्यबाबत कधीही फारसं बोलताना दिसत नाहीत.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”