-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत राज्य सरकार तसंच बॉलिवूडवर सतत टीका, आरोप करत असल्यामुळे सध्या चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मुबंई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने वादात आणखीन भर पडली होती. (Photos: Kangana Twitter)
-
दरम्यान कंगनाने महापालिकेने केलेल्या कारवाईनंकतर आपल्या कार्यालयाची नेमकी काय परिस्थिती आहे याचे फोटो ट्विटरला शेअर केले असून संताप व्यक्त केला आहे.
-
फोटो ट्विट करताना कंगनाने हा बलात्कार नाही तर काय आहे? असा उद्विग्न सवाल विचारला आहे.
-
आपल्या उद्ध्वस्त ऑफिसचे फोटो ट्विट करत कंगनाने मोदींचा वाढदिवस #NationalUnemploymentDay17Sept म्हणून साजरा करणाऱ्यांवरही टीका केली आहे.
-
माझ्या ऑफिसला स्मशान बनवलं, किती लोकांचा हातचा रोजगार गेलाय काय माहिती असं कंगनाने म्हटलं आहे. एक फिल्म युनिट हजारो लोकांना रोजगार देतं. एक चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृह ते पॉपकॉर्न विकणाऱ्यापर्यंत सर्वांचं घर चावलतं असं कंगनाने म्हटलं आहे.
-
तुटलेल्या कार्यालयाचे फोटो टाकताना कंगनाने हा माझ्या स्वप्न, स्वाभिमान, भविष्यावर बलात्कार असल्याची टीका केली आहे.
-
जे कधी मंदिर होतं त्याचं स्मशान बनवलं…पहा माझ्या स्वप्नांना कसं चक्काचूर केलं आहे. हा बलात्कार नाही ? अशी विचारणा कंगनाने केली आहे.
-
कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला होता.महापालिकेच्या कारवाईवर कंगनाने संताप व्यक्त करताना पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला होता. तसंच पालिका कर्मचारी आणि पोलिसांचा उल्लेख बाबरची सेना असा केला होता.
-
महापालिकेकडून कंगनाला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने ९ सप्टेंबरला सकाळी पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली.
-
न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली असून हायकोर्टात प्रकऱण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान कंगनाने पालिकेकडून दोन कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”