प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री जिया मानेक पुन्हा एकदा एका मोठ्या शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. काही दिवसांपूर्वीच जियाच्या 'साथ निभाना साथिया' या लोकप्रिय मालिकेवरील 'रसोडे मे कौन था' हा रॅप साँग तुफान व्हायरल झाला होता. एकेकाळी जिया देशभरात 'गोपी बहु'च्या नावाने चर्चेत होती. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे जियाचं करिअर बर्बाद झालं. जिया मानेकने २०१० मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील 'साथ निभाना साथिया' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेने तिला प्रसिद्धी, पैसा सर्वकाही मिळवून दिलं होतं. काही महिन्यांमध्येच तिची छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख झाली. २०१२ मध्ये जियाने कलर्स वाहिनीवरील 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. स्टार प्लस आणि साथ निभाना साथियाच्या निर्मात्यांना जेव्हा ही गोष्ट समजली की जिया कलर्स वाहिनीच्या शोमध्ये भाग घेत आहे, तेव्हा त्यांनी रातोरात तिला मालिकेतून काढून टाकलं होतं. जिया मानेकच्या जागी गोपी बहुच्या भूमिकेसाठी देवोलिना भट्टाचार्यची निवड झाली. साथ निभाना साथियाच्या मालिकेतून काढून टाकल्यानंतर जियाच्या करिअरला उतरती कळा लागली. जिया 'झलक दिखला जा' हा शोसुद्धा जिंकू शकली नव्हती आणि पुन्हा तिला मालिकेत मुख्य भूमिकासुद्धा मिळाली नाही. आता आठ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १४' या रिअॅलिटी शोमध्ये जियाने स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल