शाहरुख खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात शाहरुख आणि काजोल प्रमाणेच सना सइदने साकारलेली बालकलाकाराची भूमिकाही तितकीच गाजली होती. ( सौजन्य : सगळे फोटो सना सइद इन्स्टाग्राम) या चित्रपटात सनाने शाहरुखच्या मुलीची म्हणजे छोट्या अंजलीची भूमिका वठविली होती. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटानंतर सना सइद या बालकलाकाराचा स्टारडम प्रचंड वाढला. या चित्रपटानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं. परंतु लहानपणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही चिमुकली आता काय करते असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सना आता मोठी झाली असून एक ग्लॅमरस अभिनेत्री झाली आहे. सनाचे आताचे फोटो पाहिल्यानंतर हीच ती बालकलाकार होती यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. २२ डिसेंबर १९८८ साली जन्म झालेली सना आता प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. बऱ्याच वेळा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सना बऱ्याच रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकली आहे. ‘झलक दिखला जा- 6’ (2013), ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ (2013), ‘नच बलिए – 7’ (2014), ‘खतरों के खिलाडी -7’ (2016) या शोमध्ये ती सहभागी झाली होती. बालकलाकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या सनाने २०१४ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून इन्स्टाग्रामवर ती बऱ्याच वेळा तिचे फोटो शेअर करत असते. सनाला फोटोशूट करण्याची प्रचंड आवड असल्याचं दिसून येतं. बालकलाकार असताना सनाच्या ‘कुछ कुछ होता है’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’ या चित्रपटांमधील भूमिका गाजल्या होत्या. सनाला फिरण्याची आवड असून ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असते. स्वत:ला फीट ठेवण्यासाठी सना तिचा बराचसा वेळ जीममध्ये घालवते. ट्रेडिशनल लूकमध्येही सना छान दिसते.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”