-
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करत असतानाच बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांची नावं उघड झाली आहेत. (सर्व फोटो – प्रदीप दास)
-
२५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबीमार्फत चौकशी सुरू आहे.
-
ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचं नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर शनिवारी ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली.
-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.
-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकाचं नाव समोर आलं आहे.
-
ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची आज चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्या पाठोपाठ सारादेखील एनसीबी कार्यालयात दाखल झाली.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला