-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री टिना दत्ता हिची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉसमध्ये भाग घेण्यासंदर्भात टिनाला विचारण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अपेक्षित पैसे मिळत नसल्यामुळे तिने या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टिना दत्ता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००८ साली 'उतरन' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर खेल, कोई आने को है, कर्मफल दाता शनी यांसारख्या काही मालिकांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेकदा ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत देखील असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर चाहते तिला बिग बॉसमध्ये पाहण्यास उत्सुक होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु निर्मात्यांनी अपेक्षित मानधन देण्यास नकार दिल्यामुळे तिने बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे ती केवळ नकार देऊन शांत राहिली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने बिग बॉसच्या नावाने एक पोस्ट देखील केली आहे. "डियर बिग बॉस, जितकं प्रेम मी स्वत:वर करते त्यापेक्षा अधिक प्रेम तुमचं माझ्यावर आहे. जेव्हा पासून आपल्या काल्पनिक रिलेशनशिपच्या बातम्या पसरल्या तेव्हा पासून माझी झोप उडाली आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"लोक मला सतत फोन करतायेत. नुकताच साखरपुडा झालेल्या तरुणीसारखा अनुभव मला येतोय. माझा फोन बंद आहे. अनेक जण माझ्या वार्डरोबसाठी स्पॉन्सरशिप देखील द्यायला तयार आहेत. आपलं रिलेशनशिप सध्या प्रचंड चर्चेत आहे." अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट टिनाने केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली