-
'फोर मोर शॉट्स प्लीज' ही भारतीय वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भारतासोबतच युरोप आणि अमेरिकेत देखील 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजला खुप चांगला प्रतिसाद मिळाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे सर्वोत्कृष्ट विनोदी वेब सीरिज या विभागात नामांकन मिळालं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे हा पुरस्कार पटकवणे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकाराचे जगभरातून कौतूक केले जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर विचार करता भारतीय मालिकांना एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळणे नक्कीच कौतुकास्पद आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पुरस्कार स्पर्धेत एकूण २१ देशांमधील ४४ मालिकांना नामांकन मिळाले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
येत्या २३ नोव्हेंबर रोजी एमी पुरस्कार सोहळा साजरा केला जाणार आहे. यावेळी या सोहळ्यात विजेत्यांची घोषणा केली जाईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'फोर मोर शॉट्स प्लीज' या सीरिजमध्ये 'दामिनी' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री सयानी गुप्ता हिने आनंद व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"जेव्हा चार महत्वाकाक्षी स्त्रिया एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो. या वेब सीरिजमुळे पाश्चात्य देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला." अशी प्रतिक्रिया सयानी गुप्ता हिने दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'फोर मोर शॉट्स प्लीज' सीरिजमध्ये चार विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सीरिजमध्ये सयानी गुप्ता व्यतिरिक्त क्रिती कुल्हारी, विजे बानी, मानवी गगरु यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘फोर मोर शॉट्स प्लीज’सोबतच ‘दिल्ली क्राइम’ या सीरिजला देखील एमी पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”