'दख्खनचा राजा ज्योतिबा' हा नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून २० दिवसांत १२ किलो वजन वाढवलं आहे. विशाल हा स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे. विशालने याआधी 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेत तर 'मिथुन' आणि 'धुमस' या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेचं शूटिंग कोल्हापूर चित्रनगरीत होत असून तिथेच भव्यदिव्य सेट उभारण्यात येत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विशाल या भूमिकेविषयी म्हणाला, "या मालिकेविषयी ऐकलं तेव्हापासूनच माझ्या मनात फार उत्सुकता होती. पौराणिक कथांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांची मी भेटदेखील घेतली. ज्योतिबा मंदिरातील पुजारींचीसुद्धा भेट घेतली. ही भूमिका मला मिळाली याचा फार आनंद आहे." या भूमिकेसाठी विशालने घोडदौडचंही प्रशिक्षण घेतलं. "ऑडिशन दिल्यानंतर मला माझं वजन वाढवण्यास सांगितलं होतं. २० दिवसांत मी १२ किलो वजन वाढवलं." कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे. चित्रनगरीत पहिल्यांदाच भव्य सेट उभारला जाणार असून त्यामध्ये वाडी रत्नागिरी गाव, श्री जोतिबाचा आणि श्री महालक्ष्मीचा दरबार आणि आश्रम साकारला जाणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. जिम बंद असल्याने १२ किलो वजन वाढवण्यात एका मित्राने मदत केल्याचं विशालने सांगितलं. मित्राने त्याचा जिम विशालला वापरण्यास दिला होता. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य, इन्स्टाग्राम, विशाल निकम)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”