छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. लवकरच या शोचं आगामी १४ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा शो चर्चेत आहे. मात्र, या शोची खरी चर्चा ही राधे माँमुळे रंगताना दिसत आहे. ( सौजन्य : राधे माँ फेसबुक पेज) बिग बॉसच्या आगामी १४ व्या पर्वामध्ये राधे माँ सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे राधे माँ यांना बिग बॉस १३ साठीदेखील विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी काही कारणास्तव त्यांनी नकार दिला होता. परंतु, आता १४ मध्ये त्यांना बिग बॉसच्या घरात पाहण्याची संधी मिळणार आहे. या नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून राधे माँ चर्चेत आल्या आहेत. अभिनेता सलमान खानच्या सूत्रसंचालनामुळे शोभा वाढविणाऱ्या या कार्यक्रामध्ये यंदा कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.मात्र, राधे माँ या कार्यक्रमात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉस हा कार्यक्रम विविध टास्कसोबतच कलाकारांच्या मानधनामुळेदेखील चर्चेत असतो. आतापर्यंत या शोमध्ये सहभागी झालेले अनेक कलाकार त्यांच्या महागड्या मानधनामुळे चर्चेत आले आहेत. त्याप्रमाणेच यावेळी राधे माँ यांच्या मानधनामुळे नवीन चर्चा रंगली आहे. बिग बॉस १४ मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांपैकी जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये राधे माँ च्या नावाचा समावेश करण्यात येत आहे. राधे माँ एका आठवड्यासाठी तब्बल २० लाखांपेक्षा जास्त मानधन घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या त्यांचं मानधन थक्क करणारं असल्याचं दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राधे माँ एका आठवड्यासाठी चक्क २५ लाख रुपये घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. राधे माँच्या एका फॅनपेजवर त्यांच्या मानधनाविषयी ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, शोकडून अद्यापही याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, बिग बॉसच्या या नव्या पर्वात राधे माँ यांच्यासोबत नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू हे कलाकार सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राधे माँ बऱ्याच वेळा सोशल मीडियावर विविध कारणांसाठी चर्चेत येत असतात. त्यामुळे बिग बॉसच्या या आगामी पर्वात त्यांचा सहभाग असणं ही चर्चेची बाब ठरत आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”