-
गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका फोटोशूटमुळे जे नाव चर्चेत आहे ते म्हणजे मंदिरा बेदी हिचं. नुकतेच तिनं आपल्या सोशल मीडियावर काही फोटोस शेअर केले आहेत. (सर्व फोटो – मंदिरा बेदी, इन्स्टाग्राम)
-
मंदिरा मौनी रॉयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली आहे. २८ सप्टेंबर रोजी मौनीचा वाढदिवस असतो.
-
त्या दोघांनी आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
व्हिडीओमध्ये मौनी आणि मंदिरा दोघीही त्या ठिकाणचा आनंद लुटताना दिसत आहेत.
-
तर दुसरीकडे मौनीनंही एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देताना दिसत आहे.
-
गेल्या वर्षीही मंदिरानं मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं होतं.
-
मंदिरा बेदीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक आणि कमेंटही केलं आहे.
-
अनेकांनी तिच्या फोटोना आणि तिच्या फिटनेवर कॉम्लिमेंट्सही दिले आहेत.
-
तिच्या काही चाहत्यांनी तिला हेअरस्टाईलबद्दलही सल्ला दिल्याचं पाहायला मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वी मंदिरानं शेअर केलेल्या फोटोतील कपड्यांवरून काही युझर्सनं तिला ट्रोलही केलं होतं.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”