-
सध्याच्या घडीला बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन हा विषय गाजतोय.. पण बॉलिवूड आणि व्यसनं हा प्रकार नवा नाही.. जाणून घेऊया कोण कोण गेलं होतं व्यसनांच्या आहारी.. यामध्ये धर्मेंद्र पासून रणबीर पर्यंतची नावं आहेत (सर्व फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)
-
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना जवळपास १५ वर्षांसाठी दारुचं व्यसन जडलं होतं…
-
दारुचं व्यसन लागल्याने आपलं करिअर बरबाद झाल्याची कबुलीही त्यांनी एका कार्यक्रमात दिली होती
-
ज्येष्ठ लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनाही व्यसन जडलं होतं…
-
जावेद अख्तर यांना दारुचं व्यसन जडलं होतं… ते १० वर्षे या व्यसनाच्या आहारी गेले होते ही दहा वर्षे फुकट गेली हेदेखील त्यांनी मान्य केलं आहे
-
जावेद अख्तर हे उत्तम पटकथा लेखकांपैकी एक मानले जातात
-
अभिनेत्री पूजा भटही व्यसनांच्या आहारी गेली होती, अनेक चांगल्या सिनेमांमध्ये उत्तम अभिनय केल्याने तिचं करीअर भरात होतं
-
पूजा भट्ट ही दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी मात्र तिलाही दारुचं व्यसन जडलं होतं
-
आपलं व्यसन सोडण्यासाठी तिने वडील महेश भट्ट यांच्याशी चर्चा केली होती. आता व्यसनाधिनता हा तिला एक कलंक वाटतो
-
व्यसनाधिनता आणि बॉलिवूड हा विषय संजय दत्तशिवाय अधुरा आहे कारण तोही व्यसनांच्या आहारी गेला होता
-
संजूबाबाला तरुण वयातच ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. ते सुटावं म्हणून त्याला अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं
-
एके काळी संजय दत्त हा चेन स्मोकरही होता
-
अभिनेत्री मनिषा कोईराला हिलाही दारु आणि सिगारेटचं व्यसन जडलं होतं
-
तिचे सिनेमाही तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात पण व्यसनाधिनतेमुळे तिला कॅन्सर जडला
-
कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर कॅन्सरने मला नवं आयुष्य दिलं असं वक्तव्य तिने केलं होतं
-
अभिनेता फरदीन खान हा फिरोझ खान यांचा मुलगा त्याला कोकेन खरेदी करताना अटक करण्यात आली होती
-
ड्रग्ज, अंमली पदार्थ यामुळे करीअर बरबाद झाल्याचं त्यानेही एका मुलाखतीत मान्य केलं होतं
-
प्रतीक बब्बर हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा.. मात्र व्यसनाच्या आहारी तोही गेला…
-
प्रतीकला ड्रग्ज घेण्याचं व्यसन लागलं होतं, त्याने कोकेनही घेतलंय.. याची कबुली त्याने स्वतःच दिली होती
-
जेव्हा व्यसनांच्या आहारी गेलो होतो तेव्हा कधी कधी अंथरुणातून उठताही यायचं नाही असंही प्रतीकने एका मुलाखतीत सांगितलं आहे
-
रणबीर कपूरलादेखील ड्रग्जचं व्यसन जडलं होतं
-
संजू सिनेमात रणबीरने अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी आपल्याला ड्रग्जची सवय लागल्याचं त्याने मान्य केलं होतं
-
प्रत्येक माणसाकडून काही ना काही चुका होतात तशा माझ्या हातूनही झाल्याचं रणबीरने म्हटलं होतं.
-
कॉमेडियन कपिल शर्मा यालाही दारुचं व्यसन जडलं होतं, कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहचला पण तोही दारुच्या आहारी गेला होता
-
रिहॅब सेंटरला जाऊन त्याने हे व्यसन कसोशीने सोडवलं ही बाब त्याने स्वतःच एका मुलाखतीत स्पष्ट केली आहे

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”