छोट्या पडद्यावर गाजलेली 'एक हजारों में मेरी बहना हैं' ही मालिका आजही अनेकांच्या लक्षात असेल. (सौजन्य : निया शर्मा/क्रिस्टल डिसूझा इन्स्टाग्राम पेज) या मालिकेमध्ये अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझा या मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या मालिकेनंतर निया आणि क्रिस्टल विशेष प्रकाशझोतात आल्या. खरं तर निया ही कायम तिच्या बोल्डनेस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्यासोबत क्रिस्टलनेदेखील बोल्ड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे ऑनस्क्रीनवरच्या या दोघी बहिणींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नियाने या दोघींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निया आणि क्रिस्टल दोघीही प्रचंड हॉट दिसून येत आहेत. या दोघींनी वेगवेगळ्या ठिकाणी फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो हे बाथटबमध्ये काढल्याचं दिसून येत आहे. -
निया आणि क्रिस्टलची गर्लगँग
दरम्यान, निया कायमच तिच्या हॉट आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. 'काली' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. रियाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये तिच्या' एक हजारों में मेरी बहना है', 'जमाई राजा' या मालिका विशेष गाजल्या. त्याव्यतिरिक्त 'ती खतरों के खिलाडी ८' मध्येदेखील झळकली आहे. सध्या ती 'नागिन' या मालिकेत झळकत आहे. -
नियाप्रमाणेच क्रिस्टलदेखील बऱ्याच वेळा चाहत्यांमध्ये चर्चेत असते. क्रिस्टल अनेक वेळा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेचा विषय ठरते.
-
निया आणि क्रिस्टलचा खास फोटो

४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी