-
'बिग बॉस' हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. 'बिग बॉस'चा १४ वा सीझन सुरु व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या फोटो गॅलरीत आपण 'बिग बॉस'च्या १४ व्या सीझनमध्ये झळकणारे स्पर्धक पाहणार आहोत.
-
अभिनेत्री निक्की तंबोली – या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कंचना या चित्रपट मालिकेमुळे ती प्रसिद्ध झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गायक राहुल वैद्य – हा गायक इंडियन आयडल या शोच्या पहिल्या सीझनमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री जॅस्मिन भसीन – खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये ही अभिनेत्री झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता अभिनव शुक्ला – सिलसिला बदलते रिश्तोंका या मालिकेतून हा अभिनेता प्रकाशझोतात आला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक – छोटी बहु या मालिकेतून ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता एजाज खान – तन्नू वेड्स मन्नू या चित्रपटातून हा अभिनेता प्रसिद्ध झाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री पवित्रा पुनिया – बालवीर या मालिकेमुळे ही अभिनेत्री सध्या चर्चेत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जान कुमार सानु – हा तरुण प्रसिद्ध गायक कुमार सानु यांचा मुलगा आहे. हा देखील एक चांगला गायक आहे असं म्हटलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सारा गुरपाल – ही एक पंजाबी गायिका आहे. अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये हिने गाणी गायली आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता निशांत सिंह मलकानी – राम मिलाई जोडी या मालिकेतून हा अभिनेता प्रकाशझोतात आला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग