'बिग बॉस' या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा चौदावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यंदा बिग बॉसचं घर कसं असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लॉकडाउनमध्ये जे जे अनुभव सेलिब्रिटी घेऊ शकले नाहीत, ते सर्व अनुभव स्पर्धकांना आता बिग बॉसच्या घरात घेता येऊ शकणार आहेत. थिएटर, स्पा, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल हे बिग बॉसच्या घरातच आहेत. आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार यांनी हे घर डिझाइन केलं आहे. इथूनच स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात ग्रँड एण्ट्री होणार आहे. घराला लागूनच असलेला हा गार्डन एरिया आहे. येथे पूलसुद्धा आहे. स्पर्धकांचे अनेक टास्क याठिकाणी पार पडतात. 'वीकेंड का वार' एपिसोडदरम्यान सलमान खानसोबत गप्पा मारण्यासाठी सर्व स्पर्धक याठिकाणी एकत्र जमतात. यंदा डायनिंग टेबलसुद्धा अनोख्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. किचनजवळ बार स्टुल्ससुद्धा आहेत. एकंदरीत किचनला आलिशान रेस्टॉरंट व बारचा लूक देण्यात आला आहे. हा स्पर्धकांचा बेडरूम असेल. बेडरूमच्या भिंती, बेड व सोफ्याची रंगसंगती अत्यंत आकर्षक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहेत. हा स्पर्धकांचा बाथरूम असेल. अंडरवॉटर थीम वापरून बाथरुमचं इंटेरिअर डिझाइन केलं गेलंय. स्पर्धकांचं कन्फेशन रुम रेस्टॉरंट स्टाइल डायनिंग एरियासोबतच, इनहाऊस स्पा, मॉल, थिएटर यांचासुद्धा आनंद स्पर्धकांना घेता येणार आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल