-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) या प्रकरणी चौकशी करत आहे. यामध्ये दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह अशी अनेक नावे समोर आली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ड्रग्ज विषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री गीतांजलीने एका मुलाखतीमध्ये मालिकेच्या सेटवर घडलेली घटना सांगितली आहे.
-
नुकतीच गीतांजलीने टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखीतमध्ये तिने मालिकेच्या सेटवर घडलेली घटना सांगितली आहे.
-
लंच ब्रेकमध्ये मालिकेच्या सेटवर एक अभिनेता ड्रग्ज घेऊन आला होता.
-
तो ते सर्वांना ऑफर देखील करत होता.
-
सध्या एनसीबी ड्रग्ज प्रकरणी तपास करत आहे. त्यांनी हा तपास केवळ बॉलिवूडपर्यंत न ठेवता छोटे प्रोडक्शन यूनिट आणि टीव्ही कलाकारांची देखील चौकशी करावी असे गीतांजलीने म्हटले आहे.
-
आजकाल बड्या कलाकारांचे मॅनेजर देखील त्यांना ड्रग्ज पुरवतात असे देखील तिने पुढे म्हटले आहे.
-
तसेच मोठ-मोठ्या पर्ट्यांमध्ये देखील ड्रग्जचे सेवन केले जाते असे गीतांजलीने म्हटले आहे.
-
गीतांजली मिश्राने सोनी टीव्हीवरील क्राइम पेट्रोल या मालिकेत काम केले आहे.
-
तिने मालिकेत अनेक भूमिका साकारल्या आहेत.
-
तिने क्राइम पेट्रोल या मालिके व्यतिरिक्त बालिका वधूमध्ये देखील काम केले आहे.

आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव