-
सुखदा खांडकेकर ही विविध मालिका, सिनेमांमध्ये काम करणारी गुणी अभिनेत्री आहे. सुखदाचा प्रेमविवाह झाला तो अभिजित खांडकेकरशी. हे दोघेही नाशिकचेच. आज या गॅलरीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मराठमोळ्या अभिनेत्री ज्यांनी केलं प्रियकराशीच लग्न.. चला तर मग जाणून घेऊया (सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम)
-
सुखदा आणि अभिजित हे आधी एकमेकांना ओळखत नव्हते. पण अभिजित मुंबईला येऊन माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका करत होता. ती प्रसिद्धही होत गेली. एक नाशिककर म्हणून सुखदा यांना ही बाब चांगली वाटली आणि अभिजित यांचं अभिनंदन करावसं वाटलं. त्यांनी तसं एका सोशल मीडिया मेसेज मधून अभिजित यांना कळवलं. पुढे त्यांच्यात गप्पा वाढत गेल्या. मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
मराठीतली एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ती उत्तम नृत्यांगनाही आहे. २००४ मध्ये सिनेस्टार की खोज या रिअॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला. तिथे तिची ओळख झाी ती हिमांशू मल्होत्राशी. हिमांशू आणि तिची मैत्री झाली. मग प्रेम जमलं.
-
हिमांशू आणि अमृता हे दहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. मग त्यांनी लग्न केले. दोघांचेही स्वभाव काहीसे वेगळे आहेत. तरीही एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास तेव्हाही कमी झाला नव्हता आणि आताही कमी झालेला नाही.
-
खुशबू तावडे ही मराठी आणि हिंदी मालिकांमधला एक प्रसिद्ध चेहरा आहे. एक मोहर अबोल, पारिजात, तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकांचा समावेश आहे. संग्राम साळवी म्हणजेच खुशबूचा पती. या दोघांची ओळख झाली ती देवयानी मालिकेदरम्यान
-
पुढे त्यांनी एकत्र कामही केलं.. ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. पुढे दोघांनी लग्न केलं. अभिनय क्षेत्रात दोघे कार्यरत आहेतच शिवाय दोघांनीही एक कॅफेही सुरु केलं आहे.
-
प्रिया मराठे हे नावही मराठीतल्या गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नायिका आणि खलनायिकेच्या भूमिकेसाठी प्रिया ओळखली जाते. शंतनू मोघे आणि प्रिया मराठे यांची ओळख शंतनू यांच्या मैत्रिणीमुळे झाली.
-
शंतनू मोघे एका मालिकेत काम करत होते, त्यावेळी त्या मैत्रिणीसोबत प्रिया मराठे पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. शंतनू आणि प्रियाची मैत्रीण हे एका मालिकेत काम करत होते. त्या मैत्रिणीला उशीर झाला तर शंतनू मोघे तिला घरी सोडण्यास जात असे. तिथे या दोघांनी एकमेकांना पाहिलं. पुढे दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. मग मैत्री झाली, ती वाढत गेली. त्यानंतर लग्नही झालं.
-
सखी गोखले आणि दिल दोस्ती दुनिया दारी ही मालिका हे आपल्या डोक्यात बसलेलं समीकरणच आहे. या मालिकेतील मित्रांचा ग्रुप अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला होता. या मालिकेत सु्व्रत जोशीही होता. या मालिकेआधी हे दोघे एकमेकांना ओळखत होते.
-
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेच्या सेटवर सखी आणि सुव्रत या दोघांमध्ये काहीसे वाद झाले होते. मात्र हळूहळू या दोघांमधले वाद संपले आणि त्यांची उत्तम मैत्रीही झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि मग या दोघांनी लग्नही केलं.
-
अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे मयुरी वाघ.. मयुरी वाघची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे
-
मयुरी वाघच्या अस्मिता याच मालिकेत पियुष रानडेही महत्त्वाच्या भूमिकेत होता. या मालिकेच्या निमित्ताने दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि मग २०१७ मध्ये या दोघांनी लग्न केलं.
-
प्रिया बापट हे नाव कुणाला ठाऊक नाही? प्रियाने हिंदी सिनेमा, मराठी मालिकांमध्ये काम केलंय. तिचा नवरा आहे उमेश कामत. उमेश कामही सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानेही अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलंय. शिवाय तो नाटकांमध्येही काम करतो.
-
प्रिया आणि उमेश या दोघांची आणि काय हवं? या वेबसीरिजचे दोन्ही सिझन गाजले होते. मराठी मनोरंजन विश्वातली ही एक उत्तम जोडी आहे.

आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव