'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत गेल्या बारा वर्षांपासूनच काम करणारी अभिनेत्री सोनालिका जोशी ही माधवी भाभी याच नावाने ओळखली जाते. या मालिकेत सोनालिका जोशीने गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागापासून सोनालिका जोशी या मालिकेत माधवी भाभीचे पात्र साकारत आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबरोबर त्यांचं चांगलं मैत्रीचं नातं आहे. मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सोनालिकाचंही नाव आहे. 'स्टारसनफोल्डेड डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार सोनालिका प्रत्येक एपिसोडसाठी २५ हजार रुपये मानधन घेते. सोनालिकाचा जन्म ५ जून १९७६ रोजी महाराष्ट्रात झाला. मराठी नाटकांपासून सोनालिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय सोनालिकाने मराठी चित्रपट आणि काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्