-
महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं, असा खळबळजनक आरोप लविना लोध हिने केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लविना ही महेश भट्ट यांची सुन आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे तिने महेश भट्ट यांच्यावर आरोप करताना अभिनेत्री अमायरा दस्तूर हिच्यावर देखील निशाणा साधला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान लविनाच्या या आरोपांवर आता अमायराने प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती लविनाविरोधात मानहानिचा दावा ठोकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अमायराच्या वकिल सवीना बेदी यांनी लविनाने केलेला आरोप फेटाळून लावले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अमायराला बदनाम करण्यासाठी असे खोटे आरोप केले जात असल्याचं त्या म्हणाल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जर लविनाने त्वरित जाहिर माफी मागितली नाही तर तिच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकला जाईल, असाही इशारा आमायराच्या वकिलांनी दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध हिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या व्हिडीओमध्ये तिने पती सुमित आणि महेश भट्ट यांच्यावर आरोप केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तसंच माझा पती सुमित ड्रग्स आणि मुली सप्लाय करतो असा आरोपही तिने केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, अशा आशयाचे आरोप लविनाने केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अमायरा दस्तूर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली