-
देशात मोठ्या प्रमाणात पाहिल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि वेब शोने गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक नव्या गुणवान चेहऱ्यांना प्रेक्षकांच्या मनात एक ओळख मिळवून दिली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नसते तर यांच्यापैकी बहुतांश चेहरे हे बॉलिवूडच्या तथाकथित ग्लॅमर आणि सुपरहिट्सच्या प्रवाहात कुठल्या कुठे हरवले असते. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या टॉप १० अभिनेत्री कोणत्या ते जाणून घेऊयात..
-
राधिका आपटे- लघुपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री राधिका आपटे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर राज्य करतेय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज', 'सेक्रेड गेम्स', 'घौल' यांसारख्या सीरिजनंतर ती भारतातील वेब सीरिज अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी आहे.
-
मानवी गगरु- पीके, नो वन किल्ड जेसिका यांसारख्या चित्रपटातून मानवीने तिच्या अभिनयाची छाप सोडली. पण 'ट्रिप्लिंग' आणि 'पिचर्स' या वेब सीरिजमुळे तिला खरी ओळख मिळाली. यानंतर ती 'फोर मोअर शॉट्स प्लीज', 'ट्रिप्लिंग सिझन २' यांमध्ये झळकली.
-
कियारा अडवाणी- बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी कियारा 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमुळे रातोरात सोशल मीडियावर चर्चेत आली. त्यानंतर 'गिल्टी' या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटातही तिने दमदार भूमिका साकारली.
-
पालोमी घोष- 'टाइपरायटर' या नेटफ्लिक्सवरील हॉरर-थ्रिलर वेब सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या पालोमीची ओळख सुरुवातीला बोल्ड अभिनेत्री अशी होती. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून तिची खूप वाहवा झाली. नंतर तिने 'द वेटिंग सिटी' आणि 'गांधी ऑफ द मंथ' यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही दमदार अभिनयाची छाप सोडली.
-
मिथिला पालकर- 'लिटिल थिंग्स' आणि 'गर्ल इन द सिटी' या वेब सीरिजमुळे मिथिला वेब क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली. कप साँगमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मिथिला आता अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. फोर्ब्सच्या ३० अंडर ३० यादीत मिथिलाचं नाव होतं.
-
स्वरा भास्कर- तनू वेड्स मनू या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारणारी स्वरा भास्कर सोशल मीडियावर सध्या चर्चेतलं नाव आहे. 'इट्स नॉट दॅट सिंपल' या वेब सीरिजमधल्या तिच्या भूमिकेची फार चर्चा झाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वरा भास्कर हे नाव फारच लोकप्रिय आहे.
-
भूमी पेडणेकर- नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमध्ये भूमीने सुधाची भूमिका साकारली होती. 'दम लगा के हैशा' या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. नुकताच तिचा 'डॉली किट्टी चमकते सितारे' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
-
क्रितिका काम्रा- 'कितनी मोहब्बत है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली क्रितिका 'आय डोंट वॉच टीव्ही' या वेब सीरिजमुळे विशेष चर्चेत आली. टीव्ही अभिनेत्री आणि त्यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या सीरिजचं दिग्दर्शन नकुल मेहताने केलं होतं.
-
मंजिरी फडणीस- विविध भाषांमधील विविध भूमिकांसाठी मंजिरी ओळखली जाते. मंजिरीने आतापर्यंत हिंदी, तामिळ, मल्याळम, बंगाली, मराठी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातील तिची भूमिका विशेष ओळखली जाते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॅरट हाऊस' या वेब सीरिजमुळे ती प्रकाशझोतात आली. यातील तिच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली.
-
कल्की कोचलीन- शॉकर्स, मेड इन हेवन, सेक्रेड गेम्स २ यांसारख्या वेब सीरिजमधून कल्की चर्चेत आली. बॉलिवूडमध्ये कल्की जरी प्रसिद्ध असली तरी वेब विश्वात तिची एक वेगळीच ओळख आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”