
'लक्ष्मी' या अक्षय कुमारच्या चित्रपटात अभिनेता शरद केळकरने छोटी भूमिका साकारली आहे. पण तीच भूमिका सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतेय. 
छोट्याशा भूमिकेतही आपली छाप सोडणाऱ्या शरद केळकरने छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात केली. 
दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात करणाऱ्या शरदने 'आक्रोश', 'सात फेरे', 'उतरन' आणि 'एजंट राघव' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. 
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर शरद सध्या चित्रपट व वेब सीरिजमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करतोय. 
मनोज वाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' आणि 'स्पेशल ओपीएस' या वेब सीरिजमध्ये, तर 'भूमी' आणि 'गोलियों की रासलीला- रामलीला' या चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या. 
अजय देवगणच्या 'तान्हाजी' या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळीही त्याचं विशेष कौतुक झालं होतं. 
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्याने जिम ट्रेनर म्हणूनही काम केलंय. 
शरद केळकर लहान असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. आईला आर्थिकरित्या मदत करण्यासाठी त्याने २००० मध्ये जिम ट्रेनरमधून कामाला सुरुवात केली. -
सुरुवातीच्या काळात शरदला अडखळत बोलण्याचा त्रास होता. त्यावरही त्याने यशस्वीरित्या मात केली.
-
शरदने 'बाहुबली' या हिंदी व्हर्जनमधील चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला स्वत:चा आवाज दिला. इतकंच नव्हे तर 'xXx : रिटर्न ऑफ जेंडर केज' या दीपिका पदुकोणच्या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधील विन डिझेलच्या भूमिकेलासुद्धा त्याने आवाज दिला.
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…