छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेला राहुल वैद्य साऱ्यांनाच माहित असेल. राहुल आज कलाविश्वातील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. ( सौजन्य : सर्व फोटो राहुल वैद्य / दिशा परमार इन्स्टाग्राम पेज) सध्या राहुल 'बिग बॉस १४'मध्ये सहभागी झाला असून या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. अलिकडेच राहुलने त्याची प्रेयसी दिशा परमार हिला खास अंदाजात लग्नाची मागणी घातली. राहुलने दिशाला प्रपोज केल्यानंतर दिशा परमार कोण हा एकच प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला जाऊ लागला. तर राहुलच्या आयुष्यात असलेली दिशा परमार ही एक उत्तम अभिनेत्री आहे. दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. 'प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा','वो अपनासा' या कार्यक्रमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. 'प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेत तिने पंखुडी ही व्यक्तीरेखा साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही भूमिका विशेष गाजली होती. दिशा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा ती तिचे किंवा राहुलसोबतचे फोटो शेअर करत असते. दिशाला फिरण्याची प्रचंड आवड असल्याचं या फोटोवरुन दिसून येत आहे. दिशाचं मनमोहक हास्य. -
दिशा अनेकदा तिचे हटके फोटो शेअर करत असते.
-
दिशाने शेअर केलेला खास फोटो
-
बिंधास्त अंदाजात दिशाने दिलेली पोझ
-
पारंपरिक कपड्यांमध्ये खुललं दिशाचं सौंदर्य

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..