-
अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर. (फोटो सौजन्य – अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम)
-
‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता ही व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती.
-
शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर लाखो जण घायाळ झाले होते.
-
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास दिवाळीच्या निमित्ताने काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
-
अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे. व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे.
-
अपूर्वाला स्वयंपाक करायलाही फार आवडतं. लॉकडाउनमधील तिने बराच वेळ नवनवीन पदार्थ बनवण्यात घालवला. अभिनयाव्यतिरिक्त तिला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं.
-
अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. या मालिकेनंतर ‘आराधना’, ‘एकापेक्षा एक’,’तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलं.
-
तसंच तिने ‘चोरीचा मामला’, ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती काही जाहिरांतींमध्येही झळकली आहे.
-
शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. झी युवा वाहिनीवरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अपूर्वा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक