-
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आज राखीचा वाढदिवस आहे. ४२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
वाढदिवसाच्या निमित्ताने राखीच्या आयुष्यातील काही चकित करणारे फॅक्ट या फोटो गॅलरीत पाहूया. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१९९७ साली 'अग्निचक्र' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला ५० रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य