सुहासिनी मुळ्ये हे नाव मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टेलिव्हिजनवर प्रसिद्ध आहे. सुहासिनी यांनी १९६९ मध्ये करिअरची सुरुवात केली असून आतापर्यंत त्यांनी जवळपास ५३ चित्रपटांमध्ये काम केलंय. सुहासिनी यांनी २०११ मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी अतुल गुर्तु यांच्याशी लग्नगाठ बांधली. 'लगान' चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुहासिनी यांचं हे पहिलंच लग्न. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे त्यांनी सिद्ध केलं. अतुल हे फिजिसिस्ट असून फेसबुकद्वारे दोघांची ओळख झाली. लग्नाच्या वेळी अतुल हे ६५ वर्षांचे होते. त्यांचं हे दुसरं लग्न असून पहिल्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं. १९९० च्या दशकात सुहासिनी रिलेशनशिपमध्ये होत्या असं म्हटलं जातं. मात्र त्या ब्रेकअपनंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही. २०१० मध्ये सुहासिनी यांची अतुल यांच्याशी ओळख झाली आणि १६ जानेवारी २०११ रोजी दोघांनी लग्न केलं. सुहासिनी यांनी 'लगान', 'दिल चाहता है', 'जोधा अकबर' या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “तुझ्या मायचा…”