'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नगाठ बांधणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. २७ नोव्हेंबर रोजी देवकार्य पार पडलं. त्याचे काही फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले. देवकार्यासाठी सईने जांभळ्या रंगाची खणाची साडी नेसली असून तिचा होणारा पती तिर्थदीप रॉय याने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला. तिर्थदीप व आई-बाबांसोबतचे हे फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. खणाची साडी, मोत्यांचे दागिने, चंद्रकोर अशा पारंपरिक वेशभूषेत सईचं सौंदर्य खुलून दिसत आहे. २८ नोव्हेंबरला सईचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर २९ नोव्हेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमासाठी सई व तिर्थदीपने लाल रंगाचा ड्रेस कोड पाळण्याचं आवाहन पाहुण्यांना केलं आहे. याच दिवशी सीमांत पूजन पार पडेल. ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीनुसार सई-तिर्थदीपचा विवाहसोहळा पार पडेल. रिसेप्शनसुद्धा ३० नोव्हेंबर रोजीच आयोजित केला आहे. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सई लोकूर

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया