मेघा धाडे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला आता नवीन राहिलेलं नाही. 'बिग बॉस मराठी'चं पहिलं पर्व गाजवणारी मेघा आज घराघरात पोहोचली आहे. (सौजन्य : सर्व फोटो मेघा धाडे इन्स्टाग्राम पेज) 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. विशेष म्हणजे आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगते. मेघा सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. मेघा बऱ्याच वेळा इन्स्टाग्रामवर तिच्या कुटुंबीयांचे फोटो शेअर करत असते. सध्या मेघासोबतच तिच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मेघा अनेकदा तिच्या मुलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मेघाच्या मुलीचं नाव साक्षी असून बिग बॉसच्या घरात असताना मेघाने तिच्या मुलीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. मेघाप्रमाणेच साक्षी आतापासून चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. साक्षीच्या स्मित हास्य आणि सौंदर्यामुळे अनेकांना भूरळ पडत आहे. विशेष म्हणजे साक्षी कलाविश्वात पदार्पण करणार का असा प्रश्नदेखील चाहत्यांना पडला आहे. मेघा लग्नाअगोदरच प्रेग्नंट राहिल्यामुळे ती कमी वयात आई झाली. या काळात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, मेघाने या संकटांवर मात करत स्वत: चे करिअर घडविले. वूटवरील बिग बॉस मराठीच्या अनसीनमध्ये तिने हर्षदा खानविलकरला याविषयी सांगितल्याचं पाहायला मिळतं. मेघाने लग्न केलं असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये उपाध्यक्ष आहेत. त्यांचं हे दुसरं लग्न असून त्यांनी एक मुलगादेखील आहे. -
मेघाच्या कुटुंबीयांचा फॅमिली फोटो
-
मेघा आणि तिची लेक
-
(सौजन्य : सर्व फोटो मेघा धाडे इन्स्टाग्राम पेज)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL