-
मागच्या ३० वर्षांपासून अजय देवगण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. आपल्या करिअरमध्ये अजय देवगणने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडमध्ये सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय देवगण मुंबईत जुहूमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याचे घर सुद्धा तितकेच भव्य आहे.
-
अजय देवगणचे घर मुंबईत जुहू सारख्या पॉश वस्तीमध्ये आहे. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींचे इथे बंगले आहेत.
-
अजयच्या घराजवळच शाहरुख आणि सलमान सारख्या सुपरस्टार्सची देखील घरे आहेत.
-
बॉलिवूडमध्ये अजयचा एक वेगळा दबदबा आहे. आतून त्याचे घरही तितकेच आलिशान आणि भव्य आहे.
-
घराचे इंटीरियर प्रोफेशनल डिझायनर्सनी तयार केले आहे.
-
अजय देवगणची पत्नी काजोल अनेकदा घराचे आतील फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)
-
अजयचा हा आलिशान आशियान सर्व सुख-सुविधांनी सुसज्ज आहे.
-
बॉलिवूडमध्ये जोडया बनतात आणि तुटतात. पण फार कमी अशी प्रेम प्रकरणे असतात, जी विवाहापर्यंत पोहोचतात. अजय देवगण आणि काजोल यांच नातं सुद्धा असचं आहे.
-
अजय आणि काजोलच्या लग्नाला आता २१ वर्ष झाली. १९९९ साली दोघे विवाहबद्ध झाले. इतक्यावर्षात कधीही त्यांच्यात बेबनाव झाल्याचं समोर आलं नाही. बॉलिवूडमध्ये अजय-काजोलकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.
-
१९९५ साली सर्वप्रथम हलचलच्या सेटवर दोघांची ओळख झाली. अजयला सुरुवातीला काजोल अहंकारी आणि खूप बडबडी वाटली होती. तिला दुसऱ्यांदा भेटण्यासाठी तो फारसा इच्छुक नव्हता. इंडिया टुडेने हे म्हटले आहे.
-
काजोलला सुद्धा सुरुवातीला अजय शांत राहणारा, कोणात न मिसळणारा, अलिप्त राहणारा मुलगा वाटला होता.(फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)
-
चित्रीकरण सुरु असताना एका दृश्याच्यावेळी अजय आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो याची जाणीव काजोलला झाली.
-
हलचलच्या सेटवर अजय-काजोलची ओळख झाली पण लगेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत. पहिली दोन वर्ष त्यांच्यात फक्त मैत्री होती.
-
दोन वर्षानंतर आम्ही एकत्र येऊ शकतो का? या दृष्टीने परस्पराबद्दल विचार सुरु केला. काजोलने एका चॅट शो मध्ये हे सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
-
काजोल तिच्या खासगी आयुष्याबद्दल अजय बरोबर बोलायची, त्याच्याकडून सल्ला घ्यायची त्यातून त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली.
-
"आधी आम्ही मित्र झालो. परस्परांचा विचार करतोय याची आम्हाला काही काळाने जाणीव झाली. त्यानंतर एक दिवस आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला" असे अजयने सांगितले.
-
"मला माझ्या लग्नाचा गाजावाजा नको होता. त्यामुळे मी माझ्या घराच्या गच्चीवर अत्यंत साध्यापद्धतीने विवाह केला" असे अजयने मिड डे ला सांगितले.
-
लग्नानंतरही काजोलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रीय असते.
-
बॉलिवूडमध्ये अजय आणि काजोल या जोडप्याची एक स्वतंत्र ओळख आहे. चित्रपटांप्रमाणे वैवाहिक आयुष्यातही हे एक यशस्वी जोडपे आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा