-
'मिर्झापूर' फेम अभिनेता अली फजल मुंबईतल्या एका रेस्तराँवर चांगलाच संतापलाय. या रेस्तराँने 'मिर्झापूर' वेब सीरिजसंबंधीत एक जाहिरात आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली होती. त्या जाहिरातीविरोधात अली फजलने रेस्तराँला खडेबोल सुनावलेत.
-
मुंबईच्या 'जी हुकूम' नावाच्या रेस्तराँने एक जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली होती. या जाहिरातीत मिर्झापूरमधील 'बाबू जी' अर्थात कुलभूषण खरबंदा यांचा फोटो होता. 'मिर्झापूर' वेब सीरिजमध्ये कुलभूषण खरबंदा यांनी पंकज त्रिपाठीच्या (कालीन भैया) वडिलांची भूमिका साकारली होती.
-
'बाबू जीं'च्या फोटोसोबत – "प्रीय बाबूजी, तुमच्यासाठी जी हुकूमचं स्पेशल मटण लाल मांस पाठवत आहोत. फक्त आमच्या डिलिव्हरी बॉयकडून मालिश नका करुन घेऊ" असा संदेश होता.
-
या फोटोसोबत कॅप्शनमध्ये – "मालिश हो तो बीना बहु के हाथ की और मटन हो तो बस जी हुकुम के रेस्टोरेंट का! – बाउजी #Mirzapur2" असं लिहिलं होतं.
-
अली फजलने या जाहिरातीला रिट्वीट करत संताप व्यक्त केला. "ही आतापर्यंत मी पाहिलेली सर्वात घाणेरडी जाहिरात आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने व्यंग वापरुन मटण विकण्याचा प्रयत्न करत आहात", अशा शब्दात अलीने रेस्टॉरंटला सुनावलं. तसंच, गुड्डू भैय्याच्या स्टाइलमध्ये "और हमको टॅग करके गलती किए" असं म्हणत अली फजलने या रेस्टॉरंटला फटकारलं आणि ट्विटसाठी वापरलेला मिर्झापूर हा हॅशटॅग काढण्यास सांगितलं. अलीच्या या सडेतोड रिप्लायला अनेक युजर्सही सपोर्ट करत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…