-
मायकल जॅक्सन हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि आश्चर्य चकित करणाऱ्या डान्सच्या जोरावर त्याने जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००९ साली मायकलचं निधन झालं. परंतु आज ११ वर्षानंतरही तो तितकाच चर्चेत असतो. यावरुनच आपण त्याच्या लोकप्रियतेची कल्पना करु शकतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलला चाहते त्याला 'किंग ऑफ पॉप' म्हणूनही ओळखतात. रुपेरी पडद्यावरील या किंगची जीवनशैली खऱ्या आयुष्यात देखील एखाद्या राजासारखीच होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटो गॅलरीत आपण मायकल जॅक्सनचं आलिशान घर पाहाणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'नेव्हरलँड रेंच' असं मायकलच्या घराचं नाव आहे. कॅलिफोर्नियातील लॉस ओलीव्हस या ठिकाणी २ हजार ७०० एकर परिसरात त्याने आपल्या या आलिशान घराची निर्मिती केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१९८१ साली विल्यम बोन यांच्याकडून ३ कोटी १० लाख अमेरिकी डॉलर्सला त्याने ही जमीन खरेदी केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहरापासून दूर आणि दळणवळणाची सोय नसल्यामुळे विल्यम यांनी ही जमीन मायकल विकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१९८८ साली मायकलचा मूनवॉकर हा अल्बम प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मायकल लोकप्रियतेच्या शिखरावर होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी काही दिवसांत या सुपरहिट अल्बमनं कोट्यवधी रुपयांची कमाई केली. अन् या अल्बममार्फत मिळालेल्या पैशांना त्याने नेव्हरलँडच्या निर्मितीसाठी वापरलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१९८८ ते ९१ या केवळ तीन वर्षात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन मायकलनं आपल्या आलिशान घराची निर्मिती केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलचं घर हे सेलिब्रिटींसारखा आलिशान बंगला किंवा हवेली नाही तर जणू त्याने नेव्हरलँडमध्ये एक शहरच वसवलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्याला ज्या गोष्टींचा आनंद घेता आला नाही त्यासर्व गोष्टी त्याने आपल्या या लहानशा शहरात ठेवल्या होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलच्या नेव्हरलँड नामक या लहानशा शहरात जाण्यासाठी पाच किलोमीटरचा गेट आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या गेटवरुन मुख्य हवेलीपाशी नेण्यासाठी एक चार डब्यांची ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये बसूनच मायकलचे चाहते त्याला भेटण्यासाठी त्याच्या हवेलीत जात असतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलच्या नेव्हरलँडमध्ये नदी, तलाव, जंगल, एक लहानसं प्राणी संग्रहालय, भलीमोठी बाग, चित्रपटगृह, हॉटेल्स अगदी एखाद्या शहरात ज्या सुखसोई असतात त्या सर्व आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलची हवेली जवळपास आठ किलोमीटर मोठी आहे. या हवेलीमध्ये ५० पेक्षा जास्त आलिशान खोल्या, वाचनालय, स्विमिंग पूल यांसारख्या सुखसोई आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
विशेष म्हणजे मायकल केवळ नेव्हरलँडमध्येच पिकलेल्या अन्न धान्याचं सेवन करत असे. त्यामुळे मायकलच्या हवेलीत सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळ यांची शेती देखील केली जात असे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकलच्या या आलिशान घराची किंमत आज ३ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मायकलच्या मृत्यूनंतर त्याने स्पर्श केलेल्या सर्व वस्तुंना ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्याच्या सर्व वस्तु तेथील एका वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकल हा अत्यंत सर्जनशील कलाकार होता. त्याने आपल्या आयुष्यात ज्या कुठल्या गोष्टींची कल्पाना केली ते सर्व त्याने आपल्या नेव्हरलँड या घरात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकल हा अत्यंत सर्जनशील कलाकार होता. त्याने आपल्या आयुष्यात ज्या कुठल्या गोष्टींची कल्पाना केली ते सर्व त्याने आपल्या नेव्हरलँड या घरात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मायकल हा अत्यंत सर्जनशील कलाकार होता. त्याने आपल्या आयुष्यात ज्या कुठल्या गोष्टींची कल्पाना केली ते सर्व त्याने आपल्या नेव्हरलँड या घरात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय